Pimpri News : महापालिका 10 हजार रेमडेसिवीर खरेदी करणार; 3 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या विविध रुग्णालये, जंबो कोविड सेंटर तसेच कोविड हॉस्पिटलकरीता आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या 10 हजार व्हायल्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 3 कोटी 2 लाख खर्चासह महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण सुमारे  49 कोटी 32  लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

स्थापत्य विभागाकडील शिंदे वस्ती रावेत येथील रस्त्याचे बीसी पध्दतीने डांबरीकरण करणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी होणा-या 1 कोटी 15 लाख 65 हजार,  प्रभाग क्र.4 मधील दिघी येथे डांबरी रस्ते किरकोळ देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या 27 लाख 96 हजार,  प्रभाग क्र.7 मध्ये अंतर्गत कॉलनी रस्ते आणि मुख्य डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या 31 लाख 73 हजार,  प्रभाग क्र.4 दिघी मधील विविध ठिकाणी हॉटमिक्स पध्दतीने  डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्याकामी येणा-या 33 लाख 88 हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

स्थापत्य विभागाकडील आरक्षण क्र.221 येथे बहुउद्देशिय क्रिडांगण विकसित करण्याकामी येणा-या 52 लाख 99 हजार, जलनि:सारण विभागाकडील च-होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.3 मधील मोशी गावठाण आणि शिवाजीवाडी, लक्ष्मीनगर, आदर्शनगर, गंधर्वनगरी, डुडुळगाव, शास्ञीचौक परिसरात मलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी येणा-या 30 लाख 80 हजार,  विद्युत विभागाकडील प्र.क्र.8 से.क्र.4मोकळी जागा क्र.4 येथे विरंगुळा केंद्र व उद्यान उभारणेकामी येणा-या 27 लाख 47 हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 3 मोशी येथील मोरया कॉलनी फातिमानगर, खानदेशनगर, संत ज्ञानेश्वर नगर इ. ठिकाणचे रस्ते अद्यावत पद्धतीने विकसीत करणे या कामातील विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या 2 कोटी 25 लाख 23 हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.