BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महापालिका साडेबारा कोटींची औषधे खरेदी करणार

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दवाखाने, रूग्णालयांसाठी साडेबारा कोटी रुपयांची औषधे खरेदी केली जाणार आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या चार कोटींच्या औषध खरेदीस कार्योत्तर मान्यता घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरात सात रुग्णालये आणि 28 दवाखाने आहेत. महापालिकेच्या महापालिकेचे दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 11.50 कोटी रुपये अथवा सुधारित अंदाजपत्रकात करण्यात येणा-या तरतुदीच्या मर्यादेत होणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार 2018-19 या आर्थिक वर्षात 11 कोटी 50 लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली होती. या औषध खरेदीची मुदत 28 नोव्हेंबर 2018 रोजी संपली आहे. या निविदेस औषध खरेदीची मुदत अंतिम होईपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे  2019-20 च्या अंदाजपत्रकीय तरतूदीमधून औषध खरेदीचा विषय स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवता आला नाही. 2019-20 या अंदाजपत्रकातील औषधे खरेदी लेखाशिर्षावर 12 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

रुग्णसेवेत अडथळा निर्माण होऊ  नये. यासाठी जुन्या निविदेला दिलेल्या मुदतवाढीतून दोन कोटी 13 लाख 86 हजार रुपयांचा खर्च झाला आहे.  दोन कोटी 82 लाख 48 हजार रुपयांच्या औषधांचा पुरवठा आदेश देण्यात आलेला असून औषधांचा पुरवठा सुरु आहे. या निविदेनुसार आर्थिक वर्षात चार कोटी 96 लाख 35 हजार 366 एवढा खर्च आला आहे. या खर्चास कार्योत्तर मान्यता तसेच या लेखाशिर्षावरील 12 कोटी 50 लाख तरतूदीच्या मर्यादेत प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.