Pune : सव्वा लाख पुणेकरांच्या घरांचे स्वप्न होणार साकार, महापालिकेतर्फे 2 हजार घरांची लवकरच लॉटरी

एमपीसी न्यूज – पुण्यात आपले स्वतःचे घर व्हावे, हे सर्वसामान्य पुणेकरांचे स्वप्न असते. आज जागेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे महापालिका सुमारे सव्वा लाख पुणेकरांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. 2 हजार घरांची लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे.

पुणे शहरात ‘पीपीपी’च्या माध्यमातून ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही घरे नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत, यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला घर देणे हे भाजपचे आश्वासन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ही योजना आहे. महिन्याला 10 ते 15 हजार रुपये पगार असलेल्या सर्वसामान्य पुणेकरांना घर घेणे अवघडच आहे. हे स्वप्न पुणे महापालिका पूर्ण करणार आहे. ज्या व्यक्तीला हे घर देण्यात येईल, त्यांच्या नावे शहरात इतरत्र कुठे घर असू नये, ही अट असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.