Pimpri News : महापालिका भटक्या प्राण्यांसाठी ऍनिमल शेल्टर, औषधोपचार केंद्र सुरु करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या प्राण्यांसाठी महापालिका आणि मे.पीपल फॉर ऍनिमल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऍनिमल शेल्टर (प्राणी सुश्रुषा केंद्र) आणि औषधोपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी मानधनावर पशुशल्यचिकित्सकाची नेमणूक केली जाणार आहे.

एका महिन्यात दोनशे श्वान, मांजर यांच्यावर उपचार करण्याचे उदिष्ट आहे. त्यापेक्षा कमी झाल्यास शुल्क कपात केली जाणार आहे. महापालिका दर महिन्याला संस्थेला 50 हजार रुपये देणार आहे. भटके श्वान, मांजरांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मालकी हक्क असलेल्यांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने भटके श्वान, मोकाट जनावरे याबाबत तक्रारी येतात. इजा, अपघात होऊन गंभीर जखमी, अतिसार, उलटी, गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या प्राण्यांबाबत तक्रारी येतात. तातडीने औषधोपचार करण्याची गरज असते. सद्यस्थितीत अशा भटक्या जनावरांवर दिर्घ काळ उपचार करण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ, संसाधने अपुरी आहेत. त्यामुळे वेळेवर सुविधा उपलब्ध करुन देणे अवघड जात आहे. परिणामी, तक्रारी वेळेवर पूर्ण केल्या जात नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यासाठी प्राणी सुश्रुषा, उपचार केंद्र हे उपाचारदृष्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी भटक्या श्वान, मांजर यासाठी मोफत उपचार व मालकी हक्क असणा-या श्वान, मांजर संबंधित सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया वाजवी दरात उपलब्ध करुन दिल्या जातील.

केस पेपर फी 20 रुपये, बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) 150 रुपये, specialized treatment (systemic diseases treatment fluid theraphy) 200 रुपये, रेबीज प्रतिबंधक लस 100 रुपये, क्ष-किरण (लहान जणावरे) 250 रुपये, सोनोग्राफी 350 रुपये, आयपीडी शुल्क प्रति दीन 300 रुपये, शस्त्रक्रिया सेवा शुल्क (शस्रक्रियेसाठी लागणारे साहित्य वगळून) 400 रुपये, नसबंदी शस्त्रक्रिया (महापालिकेमार्फत) श्वान, मांजर 1200 रुपये घेतले जाणार आहेत. मे. पीपल फॉर एॅनिमल संस्थेने संयुक्त विद्यमाने काम लवकरात लवकर चालू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या कामासाठी अनुभवी मनुष्यबळ दोन व्यक्ती पुरविण्याच्या मोबदल्यात संस्थेने प्रतिमहिना 50 हजार रुपयांची महापालिकेकडे मागणी केली आहे.  एका वर्षासाठी या संस्थेला महापालिका काम देणार आहे. मानधनावर पशुशल्यचिकित्सकाची सहा महिन्यासाठी नेमणूक केली जाणार आहे. याचा खर्च पशुवैद्यकीय विभागाच्या अस्थायी अस्थापना या लेखाशिर्षकामधून केला जाणार आहे. एका महिन्यात दोनशे श्वान, मांजर यांच्यावर उपचार होणे आवश्यक  आहे. त्यापेक्षा कमी झाल्यास शुल्क कपात केली जाणार आहे. दोनशेपक्षा कितीही अधिक झाले. तर वाढीव शुल्क देण्यात येणार नाही.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांना शौचालयासाठी घेऊन जाणा-या नागरिकांवर 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.