Pimpri News : महापालिकेचा 7112 कोटींचा अर्थसंकल्प ‘स्थायी’पुढे सादर

एमपीसी न्यूज – ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार  112 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) स्थायी समितीला सादर केला. 

सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 39 वा अर्थसंकल्प आहे. तर, नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी ही विशेष सभा 24 फेब्रुवारी  पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे. त्यांची शुक्रवारी (दि.12) पुण्यात नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली. हर्डीकर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.