Pune News : फक्त निवासी मिळकतीसाठी अभय योजना लागू करण्याचा पालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज –  स्थायी समितीने एक कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवण्यास मान्यता दिली होती. अभय योजनेतर्गत निवासी आणि व्यावसायिक यांना यामध्ये व मिळणार होती. मात्र आता फक्त निवासी मिळकतदारांनाच सवलत देता येणार आहे.यासंदर्भात महापालीका आयुक्तांनी प्रशासकीय आदेश काढले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी सायंकाळी मिळकत कर विभागासोबत एक आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, अभय योजना लागू करण्यास आम्ही मान्यता दिली आहे, परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

महापािलकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा मिळकत कर थकविणाऱ्यांसाठी अभय याेजना आणली हाेती. या प्रस्तावाला महाविकास आ घाडीने विराेध केला हाेता. तर प्रस्तावाला विराेधी पक्षांनी दिलेल्या तीनही उपसुचना सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जाेरावर फेटाळून लावल्या हाेत्या.

पालिकेच्या वतीने गाेळा केल्या जाणाऱ्या मिळकतकराची थकबाकी ही सुमारे सात हजार काेटी रुपये इतकी आहे. थकीत रक्कमेवर दरमहा दाेन टक्के इतकी शास्ती लावली जाते. यामुळे ही थकबाकी माेठ्या प्रमाणावर दिसुन येते. मुळ थकबाकीपेक्षा शास्तीची ( दंड ) रक्कम चार हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मिळकत कराची मुळ रक्कम वसुल करण्यासाठी ही अभय याेजना राबविण्यात यावी. ही याेजना 20 डिसेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 पर्यंत राबविली जाणार हाेती. परंतु प्रशासकीय मान्यता या प्रस्तावाला न मिळाल्याने त्याची अंमलबजावणी हाेऊ शकली नाही. परंतु आता महापालिका आयुक्तांनी केवळ निवासी मिळकत असलेल्या थकबाकीदारांनाच ही सवलत देण्यात येईल असे नमूद करीत प्रस्ताव मंजुर केला आहे. यामुळे व्यावसायिक मिळकतींना याेजनेचा लाभ मिळणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.