Pimpri : आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी महापालिकेची नवीन नियमावली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्काराचे नवीन निकष तयार केले आहेत. यंदाचे पुरस्कार नवीन निकषानुसार दिले जाणार आहेत. पुरस्कार मिळविण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या 21 निकषांची परीक्षा द्यावी लागणार आहे. 

प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांना पुरस्कारांसाठी समान निकष ठरवून दिले आहेत. त्यात 21 निकष असून, प्रत्येकास 150 गुण तर आदर्श शाळेसाठी 150 गुण ठेवले आहेत. त्यासाठी 15 निकष असून, प्रत्येकी 10 गुण दिले आहेत. या निकषांत देणग्या जमा करणे, शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रसिद्धी, प्रथितयश नियतकालिक किंवा वृत्तपत्रातील लेखन, प्रथितयश प्रकाशकाने प्रसिद्ध केलेले पाच ग्रंथ, शिक्षण हक्क कायद्यातील 10 घटकांपैकी विशिष्ट घटकांची पूर्तता, अशा निकषांचा समावेश आहे.

शिक्षक ज्या वर्गाला शिकवतो किंवा जो विषय शिकवतो. त्याचा 100 टक्के निकाल नसल्यास त्याचा या पुरस्कारासाठी विचारही केला जाणार नाही. शिक्षण विभागाने नवीन निकष जाहीर केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.