Alandi News : आळंदीत अतिक्रमणांविरोधात नगरपरिषदेची कारवाई

एमपीसी न्यूज – आळंदी येथे गुरुवारी (दि.4) आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने, आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील वडगांव रस्ता, मरकळ रस्ता या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरी, फूटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी,अतिक्रमणा विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
येथील फुटपाथवरील दुकाने, टपऱ्या यांची केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. तर काही फुटपाथवर व रस्त्यावर असलेल्या हातगाड्या, फ्लेक्स, दुकानाचे फलक हे पालिका कर्मचाऱ्यांद्वारे उचलून टॅक्टरमध्ये  ठेवण्यात आले.

ही कारवाई  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कारवाई दरम्यान आळंदी दिघी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फूटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. उद्याही अतिक्रमण विरोधात कारवाई होणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे आधिकारी सचिन गायकवाड यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.