Pune News : महापालिकेची रॅपिड अँटीजेन टेस्ट मोहिम सुरू; आतापर्यंत सव्वाशे रुग्णांचे निदान

एमपीसी न्यूज –  शहरातील कोरोना बाधितांच्या वाढती संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेली रॅपिड अँटीजेन टेस्टची मोहिमेत तीन दिवसात सव्वाशे रुग्णांचे निदान झाल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आठवडाभरात शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजाराच्या पुढे पोहोचली आहे, तर दररोज चार हजाराच्या पुढे नवे रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात महापालिकेने घेऊन ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकणार्‍या रुग्णांना शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

ही मोहीम सरकारी कार्यालयांसह शहरातील पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते, दुकानदार आणि दुकानातील कर्मचारी आदी ठिकाणी राबवली जात आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. या मोहिमेमध्ये तीन दिवसात जवळपास सात ते साडेसात हजार नागरिकांची व अधिकार्‍यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये सव्वासे रुग्णांचे निदान झाल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.