Pune : महापालिकेच्या शाळा 15 जूनपासून ऑनलाइन सुरू : मीनाक्षी राऊत

Municipal schools start online from June 15: Meenakshi Raut

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शाळा येत्या 15 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन वर्ग भरविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय  अधिकारी  मीनाक्षी राऊत यांनी दिली.

ऑनलाइन शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग आणि सूचना देण्यात आल्या आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पुस्तके मोफत दिली जातात. ही पुस्तके महापालिकेच्या 5 सेंटरमध्ये पोहोचली आहेत. तिथून पुढील 5 दिवसांत प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पोहोच करण्यात येणार आहेत.

आणखी 5 दिवसांत ही पुस्तके पालकांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कोरोनामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती आहे. ते मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. त्यावर उपाय म्हणून ऑनलाइन वर्ग हा चांगला पर्याय आहे. पालकांना वेगवेगळ्या वेळी बोलाविण्यात येणार आहे. पालकांचे यापूर्वीच मोबाईल नंबर घेऊन व्हॉट्सप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाच्या प्रत्येक विभागाने यजुमित्रा ऐप डाऊनलोड केले आहे. त्याचे 70 हजार 139 आयडी उघडण्यात आले आहे. ते पालकांपर्यंत पोहोचविले आहेत. या ऐपच्या आधारे मुलांसाठी पुस्तके डाउनलोड करायची आहेत, तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या शाळांत एकूण 92 हजार 740 विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शहरात निर्बंध असून, या काळात कामगार वर्गांची मुले गावी गेली आहेत. त्यामुळे नेमकी किती विद्यार्थी संख्या आहे. ते शाळा सुरू झाल्यानंतर समजणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.