Flag Fund : माजी सैनिकांच्या मदतीसाठी महापालिका कर्मचारी ध्वजनिधी म्हणून देणार 18 लाख रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी माजी सैनिकांसाठी “सशस्त्रसेना ध्वजदिन 2021′ अंतर्गत (Flag Fund(  18 लाख रूपयांचा निधी देणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात करण्यात येणार आहे. तसेच ही रक्कम आयकर कायदा 1961 मधील कलम 80 जी अन्वये आयकरातून 100 टक्के मुक्त करण्यात आली आहे.

देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले आहेत, अशा शूरवीरांच्या वीरपत्नी, वीरमाता, पिता, दिव्यांग सैनिक व त्यांचे कुटूंबिय यांना आर्थिक मदत देण्यासाठी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांच्या कल्याणार्थ आणि पुनर्वसनाचे विविध योजना राबविण्यासाठी या निधीचा (Flag Fund)  उपयोग केला जातो. त्यासाठी निधीची आवश्‍यकता असते. यासाठी जास्तीत जास्त निधी संकलित करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने पिंपरी महापालिकेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निधी कपात करण्याबाबत प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी आदेश काढला आहे.

Supriya Sule :  महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे सेलिब्रेशन?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्ग-1 पासून वर्ग-4 मधील 7 हजार 85 अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. आयुक्त दोन हजार, वर्ग-1मधील अधिकारी 1 हजार, वर्ग-2 मधील अधिकारी 500 रूपये, वर्ग-तीनचे कर्मचारी 200 रूपये, वर्ग-चारमधील (सफाई कर्मचारी वगळून) कर्मचाऱ्यांचे 100 रूपये कपात करण्यात येणार आहेत.

तसेच ही रक्कम आयकर कायदा 1961 मधील कलम 80 जी अन्वये आयकरातून 100 टक्के मुक्त करण्यात आली आहे. महापालिकेच्या लेखा विभागाने मासिक वेतनामधून कपात केलेल्या ध्वजनिधी रक्कमेचा एकत्रित धनादेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांच्या नावे तयार करून प्रशासन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.