सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : कालवा फुटीसारखा प्रकार पुन्हा झाल्यास महापालिका जबाबदार

एमपीसी न्यूज – खडकवासला धरण 100 टक्के भरल्यामुळे कालव्यातून पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आता कालवा फुटीसारखा प्रकार पुन्हा झाल्यास महापालिका जबाबदार असेल असे पत्र पाठवले आहे. वास्तविक याची देखभाल आणि दुरुस्ती पाटबंधारे विभाग करत असून सुद्धा आपली जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे.

पाटबंधारे विभागाने कालवा फुटण्याची भीती आहे. महापालिकेच्या हद्दीतून जाणार्‍या कालव्यावर अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, त्याचबरोबर कालव्यावरुन वाहतूक  होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला असे पत्र पाठवले आहे. मागील वर्षी कालवा फुटीची घटना घडली होती. यावेळी पाटबंधारे विभाग आणि महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. यावेळी धोकादायक ठिकाणे शोधून  दुरुस्ती सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे आता अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
spot_img
Latest news
Related news