Pune : मला उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची 24 तासांत नाराजी दूर – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – मला उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची 24 तासांत नाराजी दूर झाली. रात्री दोन- वाजेपर्यंत ते माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी नियोजन करायचे, अशी आठवण कोथरुडचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

ते मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील सत्कार समारोह प्रसंगी बोलत होते.

आगामी काळात कोथरूडसाठी खूप काही करावे लागेल. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी 20 कोटी रुपये तरतूद करून चांगले संस्कृतिक केंद्र सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोथरूडमध्ये 80 हजार लोक झोपडपट्टीत राहतात. मुंबईत एसआरए थांबले, पंतप्रधान आवास योजना थांबली, त्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची गरज आहे.

मुरलीधर मोहोळ यांना आमदार, खासदार, केंद्रात मंत्री होता येईल. रासने यांच्यावर गणपतीची कृपा होऊन त्यांची प्रगती झाली. पण, सामान्य माणसाचे काय, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. सलग 5 वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. झोपडपट्टीत पैसे वाटणे हा विषय संपेल.

देवेंद्र तुझा मार्गदर्शन असल्याचे मोहोळ तुम्ही सांगता, आगामी काळात लोक तुम्हाला मार्गदर्शन मानतील. काकडे हे पवारांना विचारल्या शिवाय काहीही करणार नाही. देवेंद्रजींनी चमत्कार केला तर त्यांना पक्षात या म्हणू, असा टोमनाही पाटील यांनी काकडे यांना मारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.