Chakan News : कंपनीत पाण्याचे टँकर पुरवण्याच्या कारणावरून एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत खूनी हल्ला केला. हि घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावात घडली.

अतुल तानाजी भोसले असे खूनी हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अक्षय पंडित बो-हाडे (वय 26 रा. म्हाळुंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अतुल भोसले यांचा कंपनीत पाणी सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. पाण्याचे टॅंकर पुरवण्याच्या कारणावरून अतुल भोसले आणि आरोपी अक्षय शिवले या दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्या कारणावरून चिडून आरोपी अक्षय शिवले आणि त्याच्या साथीदारांनी अतुल भोसले यांच्यावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. यामध्ये अतुल भोसले गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.