Pune Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा चाकूने वार करून खून

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक निर्बंध असतानाच शहरातील आंबेगाव पठार परिसरात एका 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आलाय. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

सौरभ लेकावळे (वय 25, रा. कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर वार केले असल्याची माहिती समोर येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मयत तरुण आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासूनचे वाद होते. या वादातूनच आरोपींनी आज रात्रीच्या सुमारास सौरभ लेकावळे याला आंबेगाव पठार परिसरात गाठले आणि त्याच्या सोबत वाद घालत धारदार शस्त्राने सपासप वार करीत खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सौरभला उचलू रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभ लेकावळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.