Chakan News : अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला गावाजवळील पडीक जमिनीत नेऊन तिचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ८) दुपारी साडेतीन वाजता खेड तालुक्यातील गोनवडी येथे घडली.

माउली (पूर्ण नाव माहिती नाही, वय १८, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत मुलीच्या ३५ वर्षीय चुलत्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी माउली याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन पुतणीला गोनवडी गावाजवळील बाळू बाबुराव मोहिते यांच्या पडीक जमिनीत नेले. तिथे तिचा गळा दाबून खून केला. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.