Lonavala : देवले औंढोली रोडजवळ ताजे येथील तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज –  देवले औंढोली रोडच्या बाजुला अज्ञात हल्लेखोरांकडून ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय ३२, रा. ताजे मावळ) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज (दि २७) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दत्ता हा आपल्या दुचाकी मोटारसायकलवरुन लोणावळ्याकडून देवल औंढोली रोडवरुन येत असताना देवले गावानजीक हल्लेखोरांकडून रस्त्यावर अडवून दत्ता याच्यावर धारदार शस्राने डोक्यावर, हात व पायावर वार करण्यात आल्याने दत्ता जागीच ठार ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु असून लोणावळा ग्रामीण पोलीस खुनामागील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.