BNR-HDR-TOP-Mobile

Pune : टोळक्याकडून तरुणाचा तलवारीने वार करून खून

एमपीसी न्यूज- पाच जणांच्या टोळक्याने तलवारीने वार करून एका तरुणाचा खून केला. औंध मधील नागरस रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

रफिक शेख (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. औंध मधील नागरस रस्त्यावर ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले..परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. चतुःशृंगी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.