Mundhva : डोक्यावर फरशीने वार करून एकाचा खून

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे नात्यातील महिलेसोबत ओळख ठेवल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यावर फरशीने वार करून एकाचा खून केला. ही घटना आज पहाटे पावणेतीन वाजता घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

विकास नामदेव वाघमारे (वय 42, घोरपडी, पुणे), असे मयताचे नाव आहे. गणेश सुर्यकांत जाधव (वय 29, घोरपडी, पुणे), विवेक उर्फ पप्पू सुर्यकांत जाधव (वय 31, वसाहत घोरपडी, पुणे),अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवेक नामदेव वाघमारे या त्यांच्या भावाने मुंढवा पोलीस ठाण्याला फिर्याद दिली.

फिर्यादी विवेक याचे भाऊ विकास वाघमारे याची गणेश व पप्पू यांच्या नात्यातील महिलेशी ओळख होती. या कारणाने दोन्ही आरोपींनी विकास याच्या डोक्यावर फरशीने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मुंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.