Murder in Yerwada : पुण्यात खुनाचे सत्र सुरूच, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा काही तासांत निर्घृण खून

Murder in Yerwada: Murder session continues in Pune, accused who came out from jail on parole brutally murdered in a few hours

एमपीसी न्यूज – येरवडा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर पडलेल्या आरोपीचा काही तासांतच एका टोळक्याने तीक्ष्ण हत्यारांनी वार करून  निर्घृण खून केला. येरवडा येथील शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नितीन शिवाजी कसबे (वय 22) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पुण्यातील खुनाचे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाही. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

येरवडा पोलिसांनी याप्रकरणी 16 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आकाश कनचिले, आकाश सपकाळ, आकाश मिरे, गणेश आडसूळ, निखिल कांबळे, चेतन भालेराव, ओंकार, सोनवणी आदी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन कसबे एका गुन्ह्यात सहा महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहात गेला होता. त्याच्यावर मारहाणीसह इतर अनेक गुन्हे दाखल होते. बुधवारी (२८ मे)  संध्याकाळी त्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली. त्याच रात्री नितीन एका मित्राच्या घरी गेला होता. रात्री अकराच्या सुमारास मित्रांसोबत पायी घरी निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर सोळा जणांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर वार करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.