Baramati News : अज्ञात कारणावरून 33 वर्षीय इसमाचा खून

एमपीसी न्यूज – अज्ञात कारणावरून 33 वर्षीय इसमाचा मारहाण करून खून केला असल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि.20, जुलै) रात्री साडे आठच्या सुमारास सोनवडी सुपे, ता. बारामती, पुणे याठिकाणी हा प्रकार घडला. दीपक आनंदराव सोनवणे (वय 33) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. 

याप्रकरणी मयत इसमाची पत्नी मनिषा दीपक सोनवणे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नयुम गनिम सय्यद याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नयुम याने दीपक यांना मारहाण करून त्यांचा डोक्यात कशाने तरी दुखापत केली. जखमी झालेल्या दीपक यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.