Worker Murder Case : बावधान येथील बांधकाम कामगारचा खून

एमपीसी न्यूज – बावधान येथे एका बांधकाम कामगाराचा आज पहाटे खून (Worker Murder Case) बावधान येथील बांधकाम कामगारचा खून करण्यात आला. किरकोळ कारणावरून हा खून करण्यात आल्याचा संशय प्राथमिक तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.

इतबसा जानी (वय 57, रा गंगा रेजन्ट लेबर कॅम्प, बावधन मूळ रा. नर्सिंगुडा, उडीसा राज्य) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. जानी यांचा मुलगा उपेंद्र जानी यांनी फिर्याद हिंजवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. आकाश उर्फ चेल्या पवार या आरोपीने त्यांचा खून केल्याची माहिती हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.

DID Li’l Masters Winner : नोबोजित नरझरी ठरला ‘डीआयडी लिटल मास्टर 5’चा मानकरी

मिळालेल्या माहितीनुसार,  इतबसा जानी हे काल (दि.26 जून) संध्याकाळी 6 वा लेबर कॅम्प मधील घरातून बाहेर गेले होते. ते दोन तास झाले तरी घरी परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा फिर्यादी उपेंद्र ह्याने 8 च्या सुमारास शोधाशोध सुरु केली. तो कॅम्प पासून 70- 80 मीटर दूर असलेल्या निर्जन स्थळी पोहोचल्यावर पाहिले की त्याच्या वडिलांना कुणीतरी मारत आहे. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली ज्यामुळे लोक जमा झाले. लोकांना पाहताच आरोपी तेथून पळून गेला, त्यानंतर लगेचच फिर्यादीने पोलिसांना कळवले आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले.

पोलिस उपनिरीक्षक महादेव येलमार यावेळी म्हणाले की, इतबसा जानी यांच्या डोक्यावर जोरात कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता, त्यामुळे रक्तास्त्राव झाला होता. त्यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत (Worker Murder Case)  घोषित केले.

दरम्यान फिर्यादीने सांगितले की, त्याच्या वडिलांचे व आरोपीचे 25 जूनला भांडण झाले होते. त्याचा राग मनात आरोपिने त्याच्या वडिलांवर हल्ला केला व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव येलमार करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.