Alandi News : देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीच्या घाटावर दगडाने ठेचून एकाचा खून

0

एमपीसी न्यूज – देवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूला इंद्रायणी नदीच्या काठावर एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका पुजाऱ्याने आळंदी पोलिसात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याचे वय सुमारे 30 ते 35 वर्ष आहे. धीरज संजय कुबेर (वय 30, रा. आळंदी) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीच्या घाटावर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागील बाजूला अज्ञातांनी एका व्यक्तीच्या डोक्यात दगडाने मारून त्याचा खून केला. मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता फिर्यादी कुबेर पूजेसाठी घाटावर गेले असता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.