Hinjawadi : हत्याराने भोकसून एकाचा खून

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दर्गा परिसरात नेऊन जाळला

एमपीसी न्यूज – हत्याराने भोकसून एकाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दर्गा परिसराच्या कंपाउंड आणि होर्डिंगच्या मध्ये टाकून जाळला. हा धक्कादायक प्रकार बाणेर येथे उदनशाहवली दर्गा परिसरात उघडकीस आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

संदीप पुंडलिक माईनकर (रा.  रा. संत तुकाराम नगर, पिंपरी. मूळ रा. माईन, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आशिष संदीप माईनकर (वय 28) यांनी याबाबत सोमवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संदीप माईनकर हे फिर्यादी यांचे वडील आहेत. संदीप यांचा अज्ञातांनी हत्याराने भोकसून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप यांचा मृतदेह बाणेर येथील उदनशाहवली दर्गा येथील कंपाउंड आणि होर्डिंगच्या मध्यभागी आडोशाला टाकला. त्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून मृतदेह पेटवून दिला. हा प्रकार रविवारी (दि. 29) सकाळी अकरा वाजता उघडकीस आला. अज्ञातांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like