Talavade Crime News : कठीण वस्तूने डोक्यात मारून कामगाराचा खून

एक दिवसानंतर आला प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज : कठीण वस्तूने डोक्यात मारून एका  कामगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी तळवडे, चिखली येथे उघडकीस आली.

जीवन नंदलाल शर्मा (वय 40, सध्या रा. त्रिवेणीनगर, तळवडे. मूळ रा. आसाम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी राहुल ज्ञानेश्वर भालेकर (वय 38, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन शर्मा हे फिर्यादी राहुल भालेकर यांच्याकडे कामाला होते. भालेकर यांची त्रिवेणीनगर तळवडे येथे पेईंग गेस्ट (पीजी) इमारत आहे. त्या इमारतीच्या देखभालीचे काम फिर्यादी यांनी मयत शर्मा यांना दिले होते. गुरुवारी (दि. 17) रात्री साडेआठच्या सुमारास शर्मा नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. दरम्यान, रात्री अज्ञात इसमाने कठीण वस्तूने शर्मा यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला.

त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी भालेकर यांना शर्मा त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे समजले. भालेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खुनाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.