Sangvi News : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाचा लोखंडी गज डोक्यात मारून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री दहा वाजता औंध रुग्णालयाच्या समोर घडली.

शेखर मनोहर चंडाले (वय 27, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोविंद केडाशिवा वाघेला (वय 50, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अक्षय अशोक नाईक (रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी), विक्रम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण शेखर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेखर औंध हॉस्पिटल समोरील पार्किंगजवळ असलेल्या एका झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.