Hinjawadi : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा खून

0

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री हिंजवडी येथे घडली.

निवल सुकलाल पावरा (वय 27, रा. साखरे-हुलावळे वस्ती, हिंजवडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मयत निवल यांची पत्नी हिरा पावरा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबल्या उर्फ महेंद्र तेलगोटे, गोल्या उर्फ शरद पवार (दोघेही रा. साखरे वस्ती हिंजवडी) आणि सागर कदम (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, निवल आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपी मित्रांनी आपसात संगणमत करून शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निवल यांना घरातून बाहेर बोलावले. त्यास रेडिसन ब्लू हॉटेलच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत नेत त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच डोक्यात दगड घातला. यामध्ये पावरा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खूनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III