talegaon dabhade news: इंदोरी येथील एका तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील एका तरुणाचा खून (a youth murdered at talegaon dabhade) काल रविवार, नोव्हेंबर 6 ला झाला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातून मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रणव मांडेकर, वय 20 वर्षे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो इंदोरी येथील रहिवासी होता. काल रविवार, 6 नोव्हेंबरला रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलिसांना कंट्रोल रूमला फोन आला की एका व्यक्तीचा खून झाला आला आहे. खूनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

chatushrungi news: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेतले

पोलिसांनी सांगितले की मांडेकर याच्या मित्रांमध्ये फोनवर बाचबाची झाली. त्यानंतर ते भांडण सोडवण्यासाठी सर्व मित्र तळेगाव दाभाडे शहरातील तुकारामनगर मध्ये जमले होते. तेथे काही कारणावरून वाद होऊन त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस, हातांवर व इतर ठिकाणी वार करण्यात आले होते.

पोलिस घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम तळेगाव दाभाडे पलीस ठाण्यात चालू आहे. दुर्गनाथ साळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.