Pune : दोन भिका-यांच्या वादात एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दोन भिका-यांमध्ये वाद होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे स्टेशन परिसरात आज सायंकाळी साडेसहा ते सात या दरम्यान घडली. 

सलीम मुजावर याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी सलीम मुजावर याने मयत इसमावर पेव्हर ब्लॉक डोक्यात मारले. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.