Pune News : पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

एमपीसी न्यूज : पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या भांडणांमध्ये धारदार शस्त्राने वार करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली.

डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खिलारवाडी परिसरात हा प्रकार घडला. इंद्रनील चंद्र भूषण मिश्रा (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रवीण शंकर कडू (वय 37, वडगाव दाभाडी सिंहगड रोड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगला चंद्रभूषण मिश्रा त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद झाले होते. या वादातूनच आरोपीने 22 मार्च रोजी इंद्रानील याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. धारदार कोयत्याने त्याच्या अंगावर, पोटावर, चेहऱ्यावर वार केले होते. यामध्येेेे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच 14 एप्रिल रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डेक्कन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.