Pune: बहिणीला ‘लिव्ह इन’मध्ये राहताना त्रास देतो म्हणून एकाचा खून, 5 जणांना अटक

Murder of one youth as harassment while living in live in relationship with sister 5 arrested in pune

एमपीसी न्यूज- बहिणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना तिला त्रास देतो या कारणावरुन एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री विश्रांतवाडी येथील गोकुळ नगर येथे घडली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत 5 आरोपींना अटक केली आहे.

अक्षय गागोदेकर (वय 24, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी इंद्रजित गुलाब गायकवाड (वय 23, गोकुळ नगर, धानोरी) याची बहीण अक्षय गागोदकर याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

अक्षय हा बहिणीला त्रास देतो, हा राग मनात धरुन इंद्रजित गायकवाडने आपले सहकारी निलेश विश्वनाथ शिगवण (वय 24, रा. गोकुळ नगर, धानोरी), विजय कालूराम फंड (वय 25, रा. सर्व्हंट क्वाटर्स, खडकी), कुणाल बाळु चव्हाण (वय 22, रा. बोपखेल, विश्रांतवाडी, पुणे) आणि एक अल्पवयीन मित्राच्या सहाय्याने अक्षयला दगडांनी मारहाण करुन त्याचा खून केला.

ही घटना रविवारी रात्री 1.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी यूनिट 4 चे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, हवालदार मचे, खुनवे, कॉन्स्टेबल शेलार आणि विश्रांतवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली.

त्यावेळी सर्व संशयितांना खडकी येथील ख्रिश्चन स्मशानभूमी, होळकर ब्रिज येथून ताब्यात घेतले. विश्रांतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.