Bhosari : अत्याचार करून ‘त्या’ 15 वर्षीय मुलीचा खून; सावत्र बापावर गुन्हा

एमपीसी न्यूज – आई-वडिलांच्या किरकोळ भांडणातून वडिलांनी पोटच्या 15 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. यामध्ये धक्कादायक बाब अशी की, आरोपी बापाने खून करण्यापूर्वी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी चारच्या सुमारास बॉम्बे कॉलनी, दापोडी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने पती विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 44 वर्षीय नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला तीन मुली होत्या. त्यातील एका मुलीचे लग्न झाले आहे. तर दोन मुली लहान होत्या. त्यातील एक मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत गेली. तर दुसरी घरीच होती. गुरुवारी सकाळी फिर्यादी महिला आणि आरोपीचे जुन्या भांडणाच्या कारणावरून भांडण झाले. पती-पत्नी एकमेकांशी भांडल्यानंतर आरोपी पती घराबाहेर गेला.

काही वेळानंतर पती पुन्हा घरी आला आणि पत्नीशी भांडू लागला. पत्नीला शिवीगाळ करून ‘आज तुला पिक्चर दाखवतो’ असे म्हणाला. त्यावर पत्नीने देखील प्रतिउत्तर म्हणून ‘तू काय मला पिक्चर दाखवतोस. थांब मी तुला ट्रेलर दाखवते. माझ्या मुलींना हात तर लावून बघ’ काही वेळाने आरोपी पतीने मुलीच्या तोंडावर मारहाण करून तिचा गळा आवळून खून केला. त्यापूर्वी त्याने मुलीवर अत्याचार केला.

दुपारी चारच्या सुमारास शाळेत गेलेली मुलगी घरी आली असता हा प्रकार उघसकीस आला. घटनेनंतर आरोपी घराला कुलूप लावून पळून गेला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. भोसरी पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सोच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.