Pune : बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा ‘खून’ झाल्याचे उघडकीस

एमपीसी न्यूज – पुण्यातील एरंडवणे येथे बाथरूममध्ये मृत अवस्थेत मिळालेल्या विद्यार्थ्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना तीन मार्चला सकाळी घडली होती. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सतिश गोंडाने(वय 24, रा. मध्यप्रदेश)असे मयत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा पुण्यात इंजिनिअरिंगच्या क्लाससाठी आला होता. एरंडवणे येथे तो आपल्या मित्रांसोबत राहत होता. 3 मार्चला सकाळी सौरभ त्याच्या मित्रांना बाथरुममध्ये मृत अवस्थेत मिळाला. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सौरभचा शवविच्छेदन अहवाल गुरुवारी (दि.27 सप्टेंबर) पोलिसांना मिळाला. या अहवालात सौरभच्या डोक्यात अवजड वस्तू मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

अहवालावरून डेक्कन पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.