Pune News : हडपसरमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा डोके भिंतीवर आपटले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीत राजेश सोनी (वय 22) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी राजेश महावीर सोनी (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ नबीन जलाना (वय 25, रा. पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनी दाम्पत्य फुरसुंगी परिसरात राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मयत संगीता या गृहिणी होत्या. आरोपी राजेश हा पत्नीवर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होत असत. दरम्यान 17 जानेवारी रोजी त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी त्याने तू कोणत्या मुलाला बोलतेस असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. तर तिचे डोके भिंतीवर आदळले. यात संगीता या गंभीर जखमी झाल्या.

त्यानंतर त्याने एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. तसेच आम्ही पडलो असे सांगत पत्नीला दाखल केले. यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.