Nigdi News :  घरगुती कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 31) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सेक्टर क्रमांक 26. निगडी प्राधिकरण येथे घडली.

वैष्णवी चेतन पवार (वय 22) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मयत विवाहितेच्या आई मीना सुरेश वाघेरे (वय 46, रा. वाघेरे आळी, पिंपरीगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन गोविंद पवार (वय 27, रा. सेक्टर क्रमांक 26, निगडी प्राधिकरण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतन याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मयत मुलगी वैष्णवी आणि आरोपी चेतन यांचा विवाह झाला होता. ते दोघे सेक्टर क्रमांक 26, निगडी प्राधिकरण येथे राहत होते. त्यांच्यात रविवारी रात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाच्या रागातून चेतन याने पत्नीचा गळा आवळून तसेच कपाळावर जखम करून तिला ठार मारले. याप्रकरणी रविवारी (दि. 1) पहाटे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतन याला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.