Chikhali : अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारून त्याचा खून केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळवडे येथील त्रिवेणीनगर ते तळवडे रोडवरील मोकळ्या मैदानात बुधवारी (दि. 8) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडला.

उमेश सुरेश पवार (वय 30, रा. दळवी नगर, ओटास्कीम, निगडी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष सुरेश पवार (वय 27) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उमेश याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला आला होता. त्यातून त्याने मयत उमेश याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारून त्याचा खून केला. हा प्रकार आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्रिवेणीनगर ते तळवडे रोडवरील मोकळ्या मैदानात उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like