Bhosari News : हत्या की आत्महत्या? शर्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी परिसरात एक संशयास्पद मृतदेह आढळला आहे. शर्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह असून हा प्रकार बुधवारी (दि. 24) उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी भोसरी एमआयडीसी परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मात्र मृतदेहाचे गुढगे जमिनीला टेकले असल्याने तो घातपात असावा, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हा मृतदेह दोन दिवसांपूर्वीचा असल्याने तो कुजण्यास सुरूवात झाली आहे.

मात्र कुजलेला मृतदेह खाली येऊ शकतो, यामुळे हा खून आहे की आत्महत्या, याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

एमआयडीसी भोसरी परिसरात गूढ मृत्यूची तिसरी घटना

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 नोव्हेंबर 2020 रोजी एका झोपडपट्टीतील महापालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मानवी कवटी आणि हाडे सापडली होती. मात्र ती कोणाची होती, याचा शोध लागलेला नाही.

त्यानंतर 18 फेब्रुवारी 2021 रोजी एमआयडीसी भोसरी परिसरातील खर्डेवस्ती येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळखही अद्याप पटलेली नाही.आता 24 फेब्रुवारी 2021 रोजी आणखी एक गळफास घेतलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.