Bhosari News : उसन्या पैशांच्या कारणावरून व्यावसायिकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : उसने पैसे मागितल्याचा कारणावरून आठ जणांनी मिळून एका व्यावसायिकावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 29) रात्री सव्वा दहा वाजता भोसरी अग्निशमन उपकेंद्राजवळ घडली.

सचिन बाळासाहेब मुळे (वय 39, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे खुनी हल्ला झालेल्या जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरण फुगे (वय 26), निलेश फुगे (वय 28), संकेत फुगे (वय 29), सिद्धार्थ फुगे (वय 25), गणेश गायकवाड (वय 29, सर्व रा. भोसरी) आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये उसन्या पैशांवरून वाद झाला होता. दरम्यान आरोपींनी फिर्यादी मुळे यांना भोसरी अग्निशमन उपकेंद्राजवळ बोलावून घेतले. तिथे मुळे यांच्यावर हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, सिमेंट ब्लॉकने मारून खुनी हल्ला केला. यामध्ये मुळे यांच्या डोक्यात, पाठीवर पायावर, छातीवर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.