Chikhali Crime News : चिखलीत सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला?

एमपीसी न्यूज – चिखली येथील चेरी चौकात एकास काही जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.

मारहाण झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील चेरी चौकात काही जणांची भांडणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.