Pimpri News : कोयता आणि सु-याने वार करत तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणावर कोयता आणि सु-याने सपासप वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी मोहननगर, चिंचवड येथे रस्त्यावर घडली.

आकाश उर्फ बाळा शिवाजी सलगर (वय 27) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय रंगनाथ वाघमोडे (वय 38, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी शुभम गणेश राठोड (वय 26, रा. मोई, ता. हवेली), आदित्य गणेश राठोड (वय 24, रा. मोई, ता. हवेली) आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी आकाश यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी दुपारी सव्वापाच वाजता मोहननगर, चिंचवड येथील सार्वजनिक शौचालयाच्या समोर रस्त्यावर आरोपींनी शुभम याला गाठले. ‘तू आमच्यावर ट्रॅप लावतो काय’ असे म्हणत आरोपींनी शुभमवर कोयता आणि सु-याने वार केले. यात शुभमच्या डोक्याला, छातीला, हाताला गंभीर दुखापत झाली. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.