Nigdi: पूर्ववैमनस्यातून दोघांवर खुनी हल्ला

Murderous attack on two youth in nigdi pimpri chinchwad

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. एकाला कोयत्याने तर दुसऱ्या तरुणाला दगडाने मारण्यात आले आहे. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे निगडी येथील अंकुश चौक, ओटास्कीम येथे घडली.

युसूफ मेहबूब कोरकू (वय 26, रा. ओटास्कीम, निगडी), तेजस रघुनाथ धनवडे (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी युसूफ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुन्ना शेख, छोट्या मगर, वसीम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची युसूफ यांचा भाऊ मोहम्मद कोरकू यांच्यासोबत भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मुन्ना आणि छोट्या या दोघांनी युसूफ यांच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. यात युसूफ गंभीर जखमी झाले.

आरोपींनी तेजस धनवडे या तरुणावर देखील खुनी हल्ला केला. तेजस यांच्या तोंडावर दगडाने मारून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.