Pimpri News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा पिता-पुत्रांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 25) रात्री भारतनगर पिंपरी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सुरेश कदम (वय 50), अवि सुरेश कदम (वय 30), सनी सुरेश कदम (वय 26, सर्व रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमर सुरेश ओंबासे (वय 19, रा. भारतनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी गुरुवारी रात्री साडेदहा वाजता अमर यांच्यावर खुनी हल्ला केला. फिर्यादी अमर त्यांच्या मित्रांसोबत रस्त्याने जात असताना आरोपींनी अमर यांना शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने पाठीवर, मानेवर वार करून गंभीर जखमी करत खून करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.