Mushtaq Ali Trophy : T20 स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडकर ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्र संघाची धुरा

एमपीसी न्यूज – आपल्या धडाकेबाज खेळीमुळे पिंपरी चिंचवडकर ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्र संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत तो महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसेल. ऋतुराज आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. तसेच, संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महाराष्ट्राला एलिट गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे आणि हा संघ लीग स्टेजचे सामने लखनौमध्ये खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना तामिळनाडूशी होणार आहे. गायकवाडनंतर उपकर्णधारपदी नौशाद शेख याची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अनुभवी फलंदाज केदार जाधवचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

ऋतुराज गायकवाडने जुलै 2021 मध्ये श्रीलंका मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी शानदार खेळ दाखवला आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर आता त्याच्यावर महाराष्ट्र संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीसह नेतृत्वावर देखील लक्ष राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.