Talegaon Dabhade : सुप्रसिद्ध गायक पं.विजय कोपरकर यांच्या गायनाचा उद्या कार्यक्रम

श्रीरंग कलानिकेतन तर्फे देण्यात येणारा “सेवाव्रती” पुरस्कार प्रकाशराव जोशी यांना जाहीर

एमपीसी न्यूज- श्रीरंग कलानिकेतनच्या कै.सुनील साने स्मृती संगीत समारोहाचे उद्या, रविवारी (दि. 26) आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पं.विजय कोपरकर यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन ऐकण्याची संधी तळेगावकर रसिकांना मिळणार आहे.

कांतीलाल शहा विद्यालय सभागृह या ठिकाणी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत ही मैफल रंगणार असून या मैफिलीत तबला साथ विवेक भालेराव करणार असून संवादिनी साथ राहुल गोळे करणार आहेत. श्रीरंग कलानिकेतन तर्फे देण्यात येणारा “सेवाव्रती” पुरस्कार यंदा श्रीरंग कलानिकेतन व कलापिनीचे माजी अध्यक्ष व मावळ परिसरातील विविध संस्थांमध्ये आणि संस्कार भारतीच्या प्रांतपातळी वर कार्यरत असणाऱ्या प्रकाशराव जोशी यांना घोषित झाला आहे या संगीत समारोहाच्या प्रसंगी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून तळेगाव आणि मावळ परिसरातील रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी व प्रमुख विश्वस्त निरूपा कानिटकर यांनी केले आहे.

Prakashrao Joshi

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.