Maval : माझे लक्ष्य मावळचा विकास, विरोधकांचे केवळ टीकेचे राजकारण-बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मी विरोधी पक्षाचा खूप आभारी आहे त्यांनी माझ्या नावाला त्यांच्या प्रचारात प्रथम स्थान दिले. मावळ विधानसभा मतदारसंघात संपूर्ण प्रचार हा माझ्यावर आरोप करण्यातच घालविला. तसेच विनंती करून मते मिळविता येते नाही म्हणून गैरसमज करून ते मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे पण मी फक्त तालुक्याच्या विकासावर भर देणार आणि त्यावरच बोलणार, असे मत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केले आहे.

आंबी, नाणोली, जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, माळवाडी या गावात गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बाळा भेगडे यांचे स्वागत केले. येथील शेतकऱ्यांना राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून खूप फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडकलेल्या जमिनी भेगडे यांनी सोडवून दिल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. आज राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामुळे आपल्या गावागावात चांगला विकास झाला असल्यामुळे आपण त्यांनाच विजयी करणार आहोत, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.

जांबवडे येथे मंदिर, पिण्याचे पाणी, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, गावात अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, स्मशानभूमी यांसारखी कामे जांबवडे गावात झाली आहे. त्यामुळे गावात विकास झाले नाही, असे कोणी बोलत असेल तर त्यांनी गावात येऊन विकास पहावा, असा टोलाही भाजपा युवा मोर्चाचे इंदोरी गण अध्यक्ष अभिजित नाटक यांनी विरोधकांना लावला.

बांधकाम मजूर योजनेच्या मार्फत गरिबांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम ही आमच्या साहेबांच्या विकासाची पावती आहे, असे मत मावळ तालुका भाजपचे उपाध्यक्ष कालिदास शेलार यांनी व्यक्त केले. तसेच विरोधकांनी केलेली कामे पहावी आणि त्यानंतर टीका कराव्यात उगाच वायफळ टीका करण्यात आपला वेळ घालवू नये, असे भाजपा युवा मोर्चा इंदोरी गण अध्यक्ष अभिजित नाटक यांनी सांगितले. तसेच घरकुल योजना यांसारख्या अनेक योजनेचा अनेक नागरिकांना फायदा झाल्यामुळे आम्हाला तालुक्यासाठी आमदार नको मंत्रीच हवा असा नागरिकांना विश्वास दाखविला.

मावळचा विकास कमळाची साथ

पुणे जिल्ह्यात मावळ तालुका एकमेव मागील 25 वर्षपासून भाजपने राखून ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारणाला शह बसला आहे. अनेकवेळा तोडाफोडीचे राजकारण करून त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी धडपड केली परंतु मावळमधील जनतेने दरवेळी त्यांना धडा शिकवला आहे. 25 वर्षांपासून मावळात भाजपची सत्ता असून मावळचा विकास हा भाजपच्या माध्यमातून होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मावळला विकासापासून वंचित ठेवणे प्रयत्न करत आहे. 25 वर्षपैकी बहुतांश काळ राज्यात आघाडीचे सरकार होते आणि त्यांनी मावळला निधी देण्यात आडकाठी घातली.

युतीचे सरकार आल्यानंतर तालुक्याला राज्यमंत्री पद मिळाले आणि 1400 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे विकासाचे मार्गावर वाटचाल तालुका करत असताना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस बाळा भेगडे यांचावर दिशाभूल करणारे आरोप करून नागरिकांत गैरसमज पसरवत आहे. परंतु मावळ मधील जनता भाजपशी एकनिष्ठ असून ते यंदा भरघोस मताने भाजपला निवडून देणार असे चित्र तालुक्यात निर्माण झाल्याने विरोधक सैरावैरा झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.