Pune News : शारिरीक शिक्षण दिनानिमित्त रविवारी ‘माझी वसुंधरा सायकल रॅली 

एमपीसी न्यूज : शारिरीक शिक्षण दिनानिमित्त (रविवारी दि. 24) माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 8:00 वा. सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. सनसिटी रोड, आनंद नगर ते माणिकबाग मार्गे धायरी येथे सायकल रॅलीचा समारोप होणार आहे.

पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली माय अर्थ फाउंडेशन, वनराई, आधार सोशल ट्रस्ट, सिंहगड युवा फाउंडेशनच्यावतीने व संकल्प मानव संसाधन विकास संस्थेच्या सहकार्याने हि सायकल रॅली होणार आहे.

यावेळी माजी पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुणे मनपा सहाय्यक आयुक्त माधव जगताप, वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास घेवारे, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. पी.एन. कदम, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, अभिनेत्री स्मिता गोंदकर, संतोष चाकणकर, मनिष जगदाळे उपस्थित असणार असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

पर्यावरणासाठी आणि स्वत:च्या शारिरीक आरोग्यासाठी जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी व सायकलप्रेमींनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन घरत यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.