Pune : राहुल गांधींसह काँग्रेस रणांगणामधून पळून गेली – रावसाहेब दानवे 

एमपीसी न्यूज – देशातील परिवार पार्टीला (काँग्रेस) 100 वर्षाहून अधिक काळाचा पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आता अध्यक्ष राहिला नसून अध्यक्षपद कोणीही घेण्यास तयार नाही. लोकसभेतील पराभव लक्षात घेता काँग्रेस पक्षाने बांधणी करण्याची आवश्यकता असताना राहुल गांधींसह काँग्रेस रणांगणामधून पळून गेली आहे, अशा शब्दात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान शुभारंभाचा कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले असून 300 च्या पुढे गेलो आहोत. आता पुढील निवडणुकीत 400 च्या पुढे लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर प्रत्येक निवडणुकीत देशाच्या पंतप्रधानपदाच्या वेळी काँग्रेस पक्षाने ज्या पक्षाला पाठिंबा देण्याचे काम केले. पण काही काळानंतर पाठींबा काढण्याचे काम आजअखेर केले आहे. या माध्यमातून कायम देशात अस्थिरता आणण्याचे काम काँग्रेसने केले आहे. मतदारांनी दाखवून दिले की काँग्रेसशिवाय देश चालू शकते.

महाराष्ट्रात 220 पेक्षा अधिक जागा महायुतीच्या येणार : रावसाहेब दानवे
आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असलो तरी आपण सर्वांनी कामाला लागावे. या निवडणुकीत आपल्याला 220 पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या आहेत. यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करावे आणि पक्षासोबत प्रत्येक नागरिकाला जोडण्याचे काम करण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.