Maval News : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून दिंडीतील वारक-यांसाठी अल्पोपहार आणि सत्कार सोहळा

एमपीसी न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कोकण विभागातून तसेच मावळ तालुक्यातून आळंदीकडे पायी येणाऱ्या सर्व दिंड्यांमधील वारकरी बंधू-भगिनींसाठी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. मंडळाच्या वतीने सर्व दिंड्यांमधील अध्यक्ष व विणेकरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून तीन वर्षांपासून विविध अध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. याही वर्षी 27 व 28 नोव्हेंबर रोजी जांभूळफाटा येथे वारक-यांसाठी अल्पोपहार आणि सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ तालुक्याच्या माजी सभापती सुवर्णा संतोष कुंभार यांच्या शुभहस्ते झाले. तालुक्यातील राजकीय व सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

सर्वांचे स्वागत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे यांनी केले. ह.भ.प.श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांच्या वतीने वारकऱ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे मार्गदर्शक ह.भ.प.श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांनी मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनिल पासगे यांनी या उपक्रमाला भेट देऊन 27 नोव्हेंबर रोजी मुंबई- पुणे हायवे, कान्हे येथे झालेल्या वारकऱ्यांच्या अपघाताची दखल घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये चालताना काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले.

संत तुकाराम महाराजांचे नववे वंशज हभप अशोक महाराज मोरे हे मंडळाचे सभासद असून यांनी या उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा व आशिर्वाद दिले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मंडळाची सर्व कार्यकारणी, विभागीय अध्यक्ष, विभागप्रमुख व ग्रामप्रतीनिधी, क्रियाशील सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संयोजन शिवाजी पवार,भरत येवले, सुभाष महाराज पडवळ, शांताराम गायखे, महादुबुवा नवघणे, पंढरीनाथ शेटे, सागर शेटे, नितीन आडीवळे, बळवंत येवले,दिपक वारिंगे, शांताराम लोहोर,देवराम सातकर, सुनिल वरघडे,नाथा महाराज शेलार, लक्ष्मण ठाकर, तसेच दत्ता महाराज हजारे, बाळासाहेब वारिंगे,आनंदराव गराडे, निलेश शेटे,दत्ताभाऊ ठाकर,रवी ठाकर, राजाराम विकारी ,भिवाजी गायखे,भगवान रा.पडवळ,रोहिदास खांडेभराड, सुरेश कांबळे,नवनाथ थोरवे, गणपत पवार, भरत ठाकर, आदींनी केले.

प्रास्ताविक दिलीप वावरे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास पडवळ यांनी केले तर आभार बजरंग घारे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.