BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश; गायकवाड यांची माहिती

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने आपले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयास फेर तपासणी करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने पडताळणी समितीला दिले असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे आपले नगरसेवक पद रद्द केल्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिकेत आज (गुरुवारी)झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 29 सप्टेंबर रोजी दिला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले होते.

गायकवाड यांनी याबाबत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर बुलडाणा जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिल्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे तोपर्यंत आपले नगरसेवक पद कायम राहिले पाहिजे. त्यामुळे आयुक्तांनी कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

.

HB_POST_END_FTR-A1
.