Nagpur News : जेव्हा कोंबड्याचा वाढदिवस दणक्यात साजरा होतो…

एमपीसी न्यूज – वाढदिवस म्हटला की जंगी सेलिब्रेशन आलेच… सजावट असेल, औक्षण, गोडाधोडाचं जेवण किंवा मटनावळीची चंगळ असेल, वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा हाच बहुतांशी मानस असतो. मात्र एका आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगू लागली आहे. हा वाढदिवस वेगळाच म्हणायलाच हवा कारण चक्क एका कोंबड्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ‘कोण काय करील याचा नेम नाही’ हेच म्हणाले लागेल!

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात कागदेलवार कुटुंबाने आपल्या लाडक्या कोंबड्याचा नुकताच वाढदिवस साजरा केला. ‘कुचा’ असे नाव असलेला हा कोंबडा कागदेलवार कुटुंबातील सर्वांचा लाडका आहे. यंदा 20 सप्टेंबर रोजी लाडक्या कुचाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कागदेलवार यांनी हा आनंद उत्सवाच्या रुपाने साजरा केला.

याबाबत अधिकची माहिती अशी की,  उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. कुचाला एक वर्ष पुर्ण झाले या आनंदात त्याची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली, कुचाचे औक्षण केले आणि गोडधोड खाऊ घालून त्याच्या वाढदिवस दणक्यात साजरा केला.

दरम्यान, या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची चर्चा सोशल मीडियावर तुफानपणे व्हायरल होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.